कवियत्री डॉ. नुरजहॉ पठाण यांना काव्यरत्न पुरस्कार

0
11

गोंदिया दि.११: येथील सुप्रसिद्ध कवियत्री डॉ. नुरजहॉ पठाण यांना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्काराने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेत सन्मानित करण्यात आले.
साहित्यिक डॉ. नुरजहॉ पठाण यांना ह्याअगोदरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचे अनेक लेख आणि कविता विविध मासिक, वृत्तपत्र, साप्ताहिक, आकाशवाणी, दूरदर्शनवरून प्रसारीत झालेल्या असून अ.भा.साहित्य संमेलन, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय साहित्यसंमेलनात त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत अहले कलम बहुउद्देशिय पत्रकार मंच व तहजिब-ए-अदब या बहुभाषिक संस्थेने दखल घेत त्यांना भारत के कोहीनूर ‘सारे जहॉ से अच्छा’ फेम अल्लमा ईकबाल राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कारासाठी निवड केली. ६ मार्च रोजी चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक माणिक गेडाम, शशी तिवारी, मनोज बोरकर, मुन्नाभाई नंदागवळी, प्रा.सुरेश खोब्रागडे, युवराज गंगाराम, मेघराज मेश्राम, डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.