पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक

0
8

पुणे, दि. 15 – पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांचा 98 मतांना विजय झाला आहे. मुक्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नंदा लोणकर यांचा पराभव केला.तर उपमहापौरपदी भाजपाचे नवनाथ कांबळे यांची निवड झाली आहे. कांबळे यांनी काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा 46 मतांनी पराभव केला. दरम्यान, शिवसेनेनं मतदानाच्या वेळी तटस्थ भूमिका घेतली.महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतरचे बुधवारी अस्तित्वात आलेले सभागृह १३वे सभागृह आहे. महापौरपदी विराजमान झालेल्या मुक्ता टिळक या पुणे शहराच्या ५६व्या महापौर आहेत. तसंच टिळक पुण्याच्या 9व्या महिला महापौर ठरल्या आहेत. तर नवनाथ कांबळे यांची उपमहापौरपदी निवड झाल्यानं रिपाइंलाही महापालिकेच्या इतिहासात प्रथमच उपमहापौरपद मिळालं आहे.