अर्थसंकल्पावर शेवटचा हात

0
13

मुंबई, दि. 17 –राज्य विधिमंडळात उद्या दि. १८ मार्च २०१७ रोजी राज्याचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर होईल. तत्पूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज दि. १७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला.
राज्याचा सन २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प उद्या दि. १८ मार्च २०१७ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दुपारी २:०० वाजता सादर होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण https://www.mahafinance.co.in/live या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.