शिवसेनेची राष्ट्रवादीशी तर काँग्रेसची भाजपशी हातमिळवणी

0
12

मुंबई,दि.२१- राज्यातील बहुतांश निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सत्तेतील त्यांचा मित्रपक्ष अर्थात शिवसेनेने राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. जिल्हा परिषदेत अतितटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शीतल सांगळे विजयी ठरल्या आहेत. काँग्रेस आणि माकप, ३ अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या उमेदवार माजी आमदार दिलीप बनकर यांची पत्नी मंदाकिनी बनकर यांचा २ मतांनी पराभव. शीतल सांगळे यांनी ३७ मते तर बनकर यांना ३५ मते मिळाले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या नयना गावित यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी भगवा फेटा बांधला आहे.दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी (मंगळवारी) निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शिवसेनेशी हातमिळवणीचा कॉंग्रेस पक्षाने निर्णय घेतल्याचे मान्य केले आहे.केवळ सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणे जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे.
गडचिरोली: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या योगीता मधुकर भांडेकर तर उपाध्यक्ष पदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार विजयी. योगीता भांडेकर यांना ३३ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मनिषा दोणाडकर यांना १८ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अजय कंकडालवार यांना ३३ तर काँग्रेसच्या रूपाली पंदीलवार यांना १८ मते मिळाली.
अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शालिनी विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड.विखेंना ५२ तर भाजपच्या सदाशिव पाचपुते यांना १९ मते.
चंद्रपूर: जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. अध्यक्षपदी देवराव भाऊ भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहारे यांची निवड
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड
सांगली: जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा भाजपची सत्ता; अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्षपदी
सोलापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीचे संजय शिंदे तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड.
रायगड: जिल्हा परिषद अध्यक्षपदी अदिती तटकरे, अदिती तटकरेंचा २० मतांनी विजय
बीड: जिल्हा परिषदेच्याळ अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार विजयी,उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांची निवड. राष्ट्रवादीचे मंगल प्रकाश सोळंके आणि शिवकन्या शिवाजी शिरसाट यांचा पराभव केला.
सातारा: विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
पुणे: जिल्हा परिषद अध्यक्षपदी विश्वास उर्फ नाना देवकाते, उपाध्यक्षपदी विवेक वळसे- पाटील
बुलडाणा: भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्थापन केली सत्ता. अध्यक्षपदी भाजपच्या उमाताई तायडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला रायपुरे यांची निवड.
अमरावती -काँग्रेसचे नितीन गोंडाने यांची जिप अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमने विजयी.काँग्रेसचे गोंडाने यांना ३२ तर भाजपचे शरद मोहोड याना२६ मते मिळाली.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उज्ज्वला पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची बहुमताने निवड झाली. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३७ मते मिळाली. भाजपाला काँग्रेसच्या चार सदस्यांनी पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री पाटील व शिवसेनेचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल चौधरी यांना प्रत्येकी २७ मते मिळाली.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी अनिल आडे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल विजयी
वर्धा : वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्षपदी भाजपचे नितीन मडावी ३४ मते घेत विजयी झाले, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या कांचन नांदुरकर ३४ मते घेत विजयी झाल्या