गतिमान संवादासाठी माहिती विभागाने अद्ययावत कार्यपद्धती अवलंबावी-येरावार

0
13

मुंबई,दि.26 : बदलत्या काळाच्या ओघात माहिती व जनसंपर्क विभागाने गतिमान संवादासाठी अद्ययावत कार्य पद्धती अवलंबून शासनाच्या सर्व जनहिताच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत गतीने पोहोचवाव्यात, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.माहिती व जनसंपर्क विभागाची आढावा बैठक राज्यमंत्री येरावार यांच्या शासकीय निवासस्थनी झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) (वृत्त) देवेंद्र भुजबळ,संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा.ना. मुसळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी येरावार म्हणाले की, माहिती विभागाचा जिल्हा माहिती अधिकारी हा शासन व जनता यामधील दुवा असून त्यांनी अद्ययावत कार्य पद्धतीचा अंगीकार करुन शासनाच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या
घटकापर्यंत पोहोचविली पाहिजे. राज्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये जिल्हा वार्षिक योजनेतून आधुनिक सोयीसुविधांनी अद्ययावत केली जावीत.राज्यात विभागाचे प्रसिद्धी होर्डिंग्ज वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी होर्डिंग्ज,रेडिओ, डिजीटल डिस्प्ले बोर्ड आदींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन येरावार यांनी केले.येरावार यांनी ‘लोकराज्य’ तसेच महासंचालनालयाच्या वतीने
प्रकाशित विविध प्रकाशनांचे विशेष कौतुक केले.