तिरोडा येथे प्रधानमंत्री मुद्रा बँक ,महिला मेळावा २७ मार्च रोजी

0
21

गोंदिया,दि.२६ : महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने २७ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता तिरोडा येथील महात्मा गांधी चौकातील माविमच्या कायमस्वरुपी तालुका विक्री केंद्र येथे स्वयंसहायता बचतगटांच्या महिलांचा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना महिला मेळावा आणि गृहपयोगी वस्तू विक्री केंद्राचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे असतील. विशेष अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, तर प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ.किशोर पारधी,जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, माविमचे विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुक्यातील बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शनीसाठी सुरु करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू विक्री केंद्राचा शुभारंभ देखील यावेळी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तालुक्यातील माविमच्या जास्तीत जास्त बचतगटांच्या महिलांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.