नरेंद्र मोदींची ‘मन की बात’; एक दिवस पेट्रोल-डिझलचा वापर टाळा

0
9

नवी दिल्ली,दि.२६- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ऑल इंडिया रेडिओवरील 30 व्या ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. आठवड्यात किमान एक दिवस पेट्रोल-डिझेलचा वापर टाळावा. त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी थांबवा, असे आवाहन पंतप्रधानांनी देशातील जनतेला केले आहे.
पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बांगलादेशाने विकास करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु सर्वांसाठी प्रेरणा आहेत. देशातील युवांना भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु त्यांच्या समाधीवर नक्की जावे, असे सांगत पंतप्रधान त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
21 जून रोजी जागतिक योग दिन आहे. त्याची तयारी आतापासून सुरु करावी, असेही पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. स्वत:ला तंदरुस्त ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन मिळवण्यासाठी योग हा उत्तम उपाय आहे. येत्या 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. जगातील 35 कोटी लोक डिप्रेशनचा शिकार झाले आहेत.याशिवाय कॅशलेस इंडियात सहभागी होणाऱ्या देशातील जनतेचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत. यातूनच न्यू इंडियाची पायाभरणी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.