संजय गांधी निराधार अनुदानयोजनासमितीची बुधवारी बैठक

0
10

नांदेड,दि.10–नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील (संगायो / इंगायो / श्राबायो ) या विशेष सहाय्ययोजनेंतर्गत प्राप्त अर्जाच्या छाननीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्षजम्मूसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 12 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. सर्व अर्जदारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी निराधार योजना शहर नांदेड यांनी केले आहे.