34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home महाराष्ट्र एसटीच्या कर्मचार्यांना विमा ठेव योजनेत वाढ

एसटीच्या कर्मचार्यांना विमा ठेव योजनेत वाढ

0
23

blank

मुंबई,दि.21 : एसटीच्या सेवेत असताना दुर्दैवाने मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून ६ लाख १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही रक्कम ३ लाख ६५ हजार एवढी होती. त्यात वाढ करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

एसटीमध्ये सध्या एक लाखाहून अधिक कर्मचारी सेवेत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीला परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, परिवहन प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आदी उपस्थित होते.

blank