महावितरणच्या प्रतीक्षा यादीवरील 3,034 विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची 2 व 3 मे रोजी पडताळणी

0
9

मुंबई, दि. 21 :- महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील 3,034  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणीयेत्या 2 3 मे रोजी संबंधित परिमंडलस्तरावर करण्यात येणार आहे. 2 मे रोजी खुल्या प्रवर्गातील तर 3 मे रोजीराखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल.महावितरणच्या जाहिरात क्र. 1/2014 नुसार विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलीहोती.  या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या 3,034 उमेदवारांची नियुक्ती विद्युत सहाय्यक म्हणून करण्यातयेत असून या विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल पातळीवर दि. 2 3 मे रोजीकरण्यात येईल.

प्रतीक्षा यादीतील 3,034 उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या छानणीनंतर विद्युत सहाय्यक या पदाचेनियुक्तीपत्र संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येईल. उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जाची प्रत तसेचपडताळणी बाबतच्या सूचना महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यातआलेल्या आहेत.  तसेच सर्व उमेदवारांना ग्रुप एसएमएसद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. उमेदवारानेऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीत तफावत अथवा माहिती चुकीची दिल्याचे पडताळणीत आढळल्यासउमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल.