25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ सेवानिवृत्त शिक्षकांची रक्कम परत गेल्याप्रकरणी लिपिकाच्या निलंबनाची घोषणा

सेवानिवृत्त शिक्षकांची रक्कम परत गेल्याप्रकरणी लिपिकाच्या निलंबनाची घोषणा

0
26

अभियंत्याच्या पदोन्नतीचे प्रकरण मार्गी लागणार

गोंदिया,दि.21 – गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व वसतंराव नाईक सभागृहात आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनाचे सहा कोटी रुपये खर्च न करता 31 मार्च रोजी परत करणाऱ्या वित्त विभागाच्या लिपिकाला दोन दिवसात चौकशी करुन निलंबित करण्याची घोषणा मुकाअ चंद्रकांत पुलकूंडवार यांनी केली. याशिवाय बांधकाम विभागातील पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या अभियंत्यांचे पदोन्नती प्रकरणही लगेच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जि प सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिली.
गेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या मारहाणीनंतर आजच्या स्थायी समिती बैठकीकडे लक्ष लागले होते. परंतु, सभा शांततेत पार पडली.अध्यक्षस्थानी अध्यक्षा उषा मेंढे होत्या.सभापती रचना गहाणे,पी जी कटरे,छाया दसरे,विमल नागपूरे सीईओ पुलकुंडवार मंचावर होते.तर जि प सदस्य गंगाधर परशुरामकर,राजलक्ष्मी तुरकर,रमेश अंबुले यांनी चर्चेत सहभाग घेतला