शिवाजी मानकर व किशोर गांगुर्डे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

0
24

मुंबई, दि. 21 : नागरी सेवा दिना निमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयात प्रथमच हा पुरस्कार या विभागातील अधिकाऱ्यांना मिळाला आहे. आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर व वरिष्ठ सहायक संचालक किशोर गांगुर्डे यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी मानकर यांनी महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन, महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्र स्पर्धेच्या यशस्वी आयोजना बरोबरच महासंचालनालयात अत्याधुनिक दृक्श्राव्य रेकॉर्डिंग स्टुडिओ, माध्यम प्रतिसाद केंद्र आणि समाज माध्यम कक्षाची निर्मिती करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल नागरी सेवा दिनी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
महासंचालनालयात सोशल मिडियाचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करीत व्टिटर, ब्लॉग, फेसबुक यासह व्हॉट्स अप बुलेटिन आणि 28 लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम, निर्णय पोहोचवणारी ‘डिजीआयपीआर न्यूज’ नावाची SMS सेवा सुरू करण्यात श्री.गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान आहे, त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.