धोकादायक बिलोली पुलावरुन वाळूची वाहतूक

0
15

नांदेड  ( सय्यद रियाज ) ,दि.१५-बिलोली तालूक्यातील येसगी गावाजवळील 1कि.मी लांब असलेले  मांजरा नदीवरील पूलाचे बेरींग गेल्या मुळे पुल थोकादायक झाले आहे.  180 टन वजणाचे ट्राला गेल्यामुळे पुलाचे बेरींग गेले आहे . पुलाचे काम 3 महीण्या पासून चालू आहे .  अजून काम पुर्ण होण्यासाठी एक महीना लागणार असल्याची  माहीती मीळाली . पुलाची क्षमता 70 टन आहे  त्या पेशा जास्त गेल्यास पूल केंवाही पडू शकतो असे सांगण्यात आले  .

बिलोली तालूक्यातील  येसगी, नागणी , बोळेगाव, गंजगाव अदी ठीकानी वाळू घाट आहेत  .तेथील वाळू घाटावर  जेसीबी द्वारे  उत्खनन केलेली वाळू टीप्पर,  10 आणी 12चाकी ट्रक मधून रांञ दिवस ओअर लोडींग क्षमते पेक्षाजास्त प्रमाणात वाळू भरुन त्याच पूलावरुन शेकडो  मोठे वाहणे जात आहे   त्या सोबत अटो बस ,दुचाकी आँटो  इत्यादी जात आहे . त्या मुळे अजून धोका निर्माण झाला आहे. लहान वाहणाना जिव मुठीत घेऊन पुलावरुन जावे लागत आहे. बिलोली -हैद्राबात मार्गावरील मांजरा नदीच्या पुलाला  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अवजड वाहणांना बंदी घालण्यात आले आहेत.  तरी पन अवजड वाहने त्याच पूलावरुन जात आहे . या कडे प्रशासन दुर्लक्ष केल्याचे दिसून येते  काही  जिवित हाणी झाल्यास त्या चे जवाबदार कोण ? या कडे सामाजिक बांधकाम विभाग जानून बुजून  दुर्लक्ष करत  आहे का ?    आता तरी त्या वाहणावर कार्यवाही होणार का या कडे सर्वाचे लक्ष आहे.गौण खनिज विभाग हा तहसिल कडे आहे म्हनुन अवैध वाळू घेउन पुलावरुन जाणाऱ्या वाहणावर   बिलोली तहसिलदार  यांनी  करवाही करावी पुला वरुन अवजड वाहतूक बंद करावी  अशी मागणी  जनतेकडून होत आहे .  बेरार टाईम्स ने  पुला विषय माहीती  घेतली .