डोणगाव येथील त्या कुटूंबानां चार लाखाची मदत

0
16

बिलोली,दि.25- तालुक्यात अवकाळी पावसाने मेघगर्जना आणि विजेच्या हजेरी लावल्याने शेतातून गावाकडे जाणा-या डोणगावयेथील तीन जणांच्या अंगावर वीज कोसळून तीघाचा जागीच मृत्यू झाला होता. तालुक्यातील डोणगांव(बु)ता.बिलोली जि. नांदेडयेथील खुर्शीद बाबु शेख वय 35,यादव चांदोबा वाघमारे वय 50,बाबुराव राजेश यंकम वय 14 यांचा समावेश होता.त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले . देगलूर बिलोली विधानसभेचे आ. सुभाष साबने ,बिलोली तहसीलदार गाढे ,शिवसेना ता.प्रमुख बाबाराव पा.रोकडे ,मंडळ अधिकारी भालके , गावातील नागरीक उपस्थित होते.