देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, माधव भंडारींची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

0
41

नाशिक – शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी येवला तालुक्यात झालेल्या उद्रेकानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी अटकसत्र सुरु केले. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवसाला मुख्यमंत्र्यांच्या पुतळा दहनाने सुरुवात झाली आहे. सायंकाळी निफाड तालुक्यातील पालखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

एकजुटीची मशाल हाती घेऊन बळीराजा आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचे चित्र उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. आंदोलनच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील धुळगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.निफाड तालुक्‍यातील पालखेड गावात शेतकऱ्यांनी मुख्‍यमंत्र्यांची प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून आपला निषेध नोंदवला. सय्यद पिंपरी येथे दूधाने भरेल्या टँकरच्या तोट्या उघडण्यात आल्या आणि 12 हजार लिटर दूध ओतून देण्यात आले. दुसरीकडे, मालेगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने एका वस्तीवर जाऊन गरीब मुलांना दूधाचे मोफत वाटप केले.