वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर तिघे जण जखमी

0
15

अमरावती 2 जून: तालुक्यात असलेल्या देवरा या गावात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याशिवाय इतर तिघे जण जखमी झाले आहेत. आज चारच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली. देवरा येथील बाबुराव देशमुख आपल्या शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले त्याच दरम्यान शेतात वीज पडल्याने बाबुराव व त्यांचे इतर तीन सहकारी त्यात जखमी झाले. बाबूराव देशमुख यांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबुराव यांच्यासह शेतात काम करणारे संजय कोठलकर, छोटू कोठलकर व हिमांशू चव्हाण हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.