राज्यातील तलावांच्या दुरूस्ती, नुतनीकरणासाठी केंद्र सहकार्य करणार : प्रा. शिंदे

0
11

नवी दिल्ली, दि. 14 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी जलसंधारण आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांना केल्याची माहिती महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील पाझर तलाव, साठवण तलावांचे नुतनीकरण, दुरूस्ती, सुधारांसाठी आवश्यक निधी केंद्राकडून मिळणार असल्याची, माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
श्री शिंदे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांची श्रम शक्ती भवन येथे भेट घेतली. श्री शिंदे म्हणाले, राज्यातील सात विभागात 2877 जूने पाझर, साठवण तलाव आहेत या तलांवाची डागडूजी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अंदाजित 275 कोटींचा निधी आवश्यक आहे. यातंर्गत तलावांमधला गाळ काढणे, तलांवाचे नुतनीकरण, दुरूस्त्या आदी करण्यात येईल, जेणे करून
या तलावांचा पुनर्वापर करता येईल. याबाबतचा विस्तारीत प्रकल्प अहवाल पाठविण्यात येईल, केंद्रीय मंत्री उमा भारतींशी या विषयांवरील बैठक सकरात्मक झाली असून त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक सहायतेचे आश्वासन दिले, असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.