छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलमधून बाहेर

0
10

मुंबई,दि.१७:- देशाच्या 14 व्या राष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आमदारांसाठी विधानसभेत मतदानची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम हे दोघे सध्या तुरुंगात आहे. दोघांना कोर्टाने मतदानाची परवानगी ‍दिली आहे. मतदानासाठी दोघांना तासभरासाठी तुरुंगाबाहेर आणण्यात आले आहे.
बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणात भायखळा जेलमध्ये आहेत. या दोघांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळावी, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. कोर्टाने त्यांची मागणी मान्य केली आहे.दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात तुरुंगातून विधानसभेत मतदानासाठी आणण्‍यात आले आहे. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुंरुगात नेण्यात येईल.