आ. गणपतराव देशमुख यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
34

मुंबई(शाहरुख मुलाणी),दि.09 – दुष्काळ भागातील सांगोला तालुक्याला पाणी मिळावे याअनुषंगाने माणनदी वरील १६ बंधारे आणि कोरडानदीवरचे १२ बंधारे हे टेंभूच्या पाण्याने तसेच म्हैसाळच्या पाण्याने भरून देणे अर्थात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरून ची मागणी आ. गणपतराव देशमुख यांनी केली होती. यामागणीला जलसंपदा विभागाचे अधिकारी विरोध करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसाच्या आत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन योग्य तो प्रस्ताव साधार करावे असे निर्देश दिले.
कायम दुष्काळ सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न सुटावा, या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माणनदी वरील १६ बंधारे आणि कोरडानदीवरचे १२ बंधारे हे टेंभूच्या पाण्याने तसेच म्हैसाळच्या पाण्याने भरून देणेची मागणी आ. गणपतराव देशमुख यांनी केली असता जलसंपदा विभागाचे अधिकारी या प्रकल्पाला विरोध होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे अवघड आहे, हे कार्य क्षेत्रा मध्ये नाही, लाभ क्षेत्रा मध्ये नाही. त्यावर आ. देशमुख म्हणाले की, दुष्काळ भागाचा पाणी प्रश्न आहे, त्यात बसवावे. कार्य क्षेत्रात नाही म्हणून तर आम्ही इथे आलो आहे, जर कार्यक्षेत्र मध्ये असते तर इथे येण्याचे कारणच नसते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगोला च्या वाट्याला जे टेंभूचे ५.५ टि.एम.सी पाणी आलेले आहे, त्यात सदर प्रकल्प कसे बसवता येईल. याबाबत सकारात्मक प्रस्ताव १५ दिवसाच्या आत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तयार करून शासनास व आमदार देशमुख यांना अवगत करावे, त्यानंतर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, अनिल बाबर, विलासराव जगताप, सुरेश खाडे, भारत भालके, माजी खासदार रणजित मोहिते-पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबाल चहल, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता टी. एन. मुंढे उपस्थित होते.