जुनाेना जंगलात एक वाघाचा मृत्यू

0
7

चंद्रपुर,दि.26- शहरालगत असलेल्या जुनोना जंगलात आज  एका वाघाचा मृतदेह आढळल्यामुळे वनविभागात एकच खळबळ माजली आहे.चंद्रपूर शहरानजीक असलेल्या जुनोना जंगलातील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ४७० मध्ये वाघ मृतावस्थेत आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यृ झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वाघ नर जातीचा असुन दोन वर्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.