गुंतवणूकीसाठी राज्यात पोषक वातावरण-मुख्यमंत्री

0
12

मुंबई दि. 18. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू झाले आहेत. स्मार्ट सिटीमुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील उद्योग धोरणात अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर वाढविण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. इन्डो अमेरिकन कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केल्यास उभय देशांना लाभ मिळेल तसेच सबंध वृद्धींगत होण्यास मदत होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज व्यक्त केले. इन्डो एशियन चेंबर आफ कॉमर्स यांच्यावतिने आयोजित एका कार्यक्रमात ते  बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रधानमंत्री यांनी जागतिक स्तरावर नवे संबध निर्माण केले आहेत. भारतात सध्या असलेली तरुणांची संख्या ही जमेची बाजू असल्याने मानव संसाधन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. राज्यात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. उद्योगवाढी साठी देशात महाराष्ट्राला प्रथम पसंती देण्यात येते. प्रत्येक उद्योगास राज्यात वाढण्याची संधी आहे.
हॉटेल ट्रायडंट येथे इन्डो एशियन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित दोन दिवस चालणाऱ्या  परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी इन्डो एशियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नानिक रुपानी, एन. वी. श्रीवासन, यु. एस. चे कांउन्सिल जनरल एडगार्ड कागन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत, पायाभूत सुविधा, डिजीटल तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि पर्यटन देवाण घेवाण यासारख्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.