शासनाची नवी भूमिका आधी सोशल आॅडीट नंतर चावडी वाचन तेव्हा कूठे कर्जमाफी

0
23

गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.24 : आधीच आॅनलाईन कर्जमाफीचे फार्म भरतांना नाकीनऊ आलेल्या शेतकर्याचे कर्जमाफीचे शुक्लकाष्ठ काही संपेना.आता सरकारने  कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्यांच्या खात्याचे लेखा परिक्षकाच्यावतीने आॅडीट केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक ती यादी संबधित गावात चावडी वाचनाच्या माध्यमातून मंजूर करवून घेणार आहेत.  गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा या प्रकियेला उशीर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे दिवळीपूर्वी कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता सध्या तरी दूरवर कुठेच दिसून येत नाही.राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत 54 लाख 59 हजार शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातून 82 हजार 295 अर्जांचा समावेश आहे.तर भंडारा जिल्ह्यातील 89 हजार 672 अर्जांचा समावेश आहे.  2 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्याने त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार असल्याचे वृत्त आहे.
आनलाईन कर्जमाफीचे फार्म भरणार्या या शेतकर्यांना सरकारच्या या नव्या भूमिकेमूळे कर्जमाफी मिळणे अशक्य झाले आहे. अर्ज दाखल न केलेल्या शेतकºयांनी अद्यापही मुदतवाढीची कोणतीही मागणी शासन अथवा प्रशासनाकडे केली नसल्याचा दावा यंत्रणेने केला.
दुसरीकडे बँकांकडून कर्जमाफी अर्जासंदर्भात ६६ कलमांमध्ये आॅनलाईन अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक बँकांनी त्याकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही. २२ सप्टेंबरपर्यंत आॅडीट संपवण्याच्या सूचना शासनस्तरावरून होत्या. प्रत्यक्षात बँक स्तरावरील कामे खोळंबले आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस लागणार असल्याचे सहकार विभागाचे म्हणने आहे.

सहकार विभागाने जारी केलेल्या यादीनुसार अहमदनगर जिल्ह्यातून तीन लाख ३४ हजार ९२० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अकोला- एक लाख ३९ हजार ४२०, अमरावती- एक लाख ९७ हजार ७९३, औरंगाबाद- दोन लाख ६८ हजार ४०२, बीड- दोन लाख ७५ हजार ३५२, भंडारा-८९ हजार ६७२, बुलढाणा-दोन लाख ५२ हजार ४०९, चंद्रपूर- एक लाख ३९ हजार ६०९, धुळे- ९३ हजार ५४९, गडचिरोली- ४५ हजार ८२७, गोंदिया- ८२ हजार २९५, हिंगोली- एक लाख नऊ हजार ३८५, जळगाव-दोन लाख ८० हजार २७०, जालना- दोन लाख १५ हजार ४०७, कोल्हापूर- दोन लाख ७० हजार ५९०, लातूर- एक लाख ९८ हजार २०१, मुंबई- २३ हजार ७१५, मुंबई(उपनगर)- १६२०, नागपूर- एक लाख १० हजार ५२०, नांदेड- दोन लाख ६६ हजार १३३, नंदुरबार- ४९ हजार १७८, नाशिक- दोन लाख ६४ हजार ७५६, उस्मानाबाद- एक लाख ३९ हजार ५७७, पालघर-३६५३, परभणी- एक लाख ८० हजार ९४०, पुणे- दोन लाख ९८ हजार ६४, रायगड- २७ हजार ६९, रत्नागिरी- ४७ हजार १९३, सांगली- एक लाख ८८ हजार ३३३, सातारा- दोन लाख ४० हजार ७४७, सिंधुदुर्ग- ३६ हजार ५२४, सोलापूर- दोन लाख २० हजार ९९२, ठाणे- ७१ हजार २७७, वर्धा- ९८ हजार ४५५, वाशिम- एक लाख २९ हजार ७८१, यवतमाळ- दोन लाख ५२ हजार ७३४, इतर- १५ हजार ३१ असे ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.कर्जमाफीसाठी केवळ थकबाकीदार शेतकरी पात्र आहेत, असा गैरसमज गावपातळीवर आहे. मात्र नियमित खातेधारकालाही आॅनलाईन अर्ज भरायचे होते, याची माहिती न पोचल्याने हजारो नियमित खातेधारकांचे अर्ज दाखलच झालेले नाहीत.