जलयुक्त शिवारसाठी तयार होणार प्रत्येक गावाचा आराखडा : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

0
17

जळगाव दि. 24 – गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. निवड झालेल्या गावामधील कामांची निवड ही ग्रामस्थांनीच करायची आहे. या गावांमध्ये शिवार फेरीचे माध्यमातून ग्रामस्थांशी चर्चा करून  गावाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
धरणगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या  जांभोरा, बिलखेडा व भोणे या गावांमधे रविवारी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवार फेरी व शेतकरी सभेचे आयोजन केले होते.
यावेळी बिलखेडा येथे झालेल्या शिवार फेरी कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांना जल व मृद संधारणाचे महत्व सांगितले. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.