मुंबई-हावडासह अनेक गाड्या रद्द

0
15

नागपूर,दि.10ः-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खडकपूर रेल्वे यार्ड येथे नॉन इंटरलॉकिंगचे काम असल्यामुळे हावडा- मुंबईसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
खडकपूर स्थानकावरील हे काम जवळपास पंधरा दिवस चालणार आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बदललेल्या वेळापत्रकाचा तपशील असा राहील.१२१५२ हावडा-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी १७ व १८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस १७ नोव्हेंबर रोजी रद्द. १२९५० संत्रागाछी- पोरबंदर एक्स्प्रेस १९ नोव्हेंबर रोजी रद्द. १२८३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस १९ नोव्हेंबर रोजी रद्द. १२१५१ एलटीटी- हावडा एक्सप्रेस १५ रोजी तर १६ ची एलटीटी- हावडा गाडी रद्द . १२८६९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस १९ नोव्हेंबर रोजी रद्द. १२८३३ अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस १८ नोव्हेंबर रोजी रद्द, १२९४९ पोरबंदर- संत्रागाछी १७ नोव्हेंबर रोजी रद्द.
वेळेत बदल
१२८६० हावडा- मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १९ नोव्हेंबर रोजी हावड्यावरून १३.५० ऐवजी १९.०० वाजता सुटेल. १२८५९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस ही गाडी १८ नोव्हेंबर रोजी ६.०० ऐवजी मुंबईवरून ११.०५ वाजता सुटेल. २२८९३ साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस ही गाडी १८ नोव्हेंबर रोजी शिर्डीवरून १३.५५ ऐवजी १७.०० वाजता सुटेल. २२५१२ कामाख्या- एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी १८ नोव्हेंबर रोजी हावडा- खडकपूर- टाटानगर या मार्गाने न जाता आसनसोल, चांदील, चक्रधरपूर या मार्गाने जाणार आहे. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार एक्स्प्रेस ही १७ रोजी एलटीटीवरून सुटणारी गाडी टाटानवगर येथे समाप्त होईल. १८०३० शालिमार- एलटीटी ही गाडी १९ रोजी शालिमारवरून न सुटता टाटानगरवरून सुटेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.