अँग्रोव्हिजनचे उदघाटन आज,उपराष्ट्रपती येणार

0
8

नागपूर,दि.10ः- मध्य भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन म्हणून नावाजलेले ‘अँग्रोव्हिजन २0१७’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन आज  १0 नोव्हेंबरपासून रेशीमबाग मैदानावर करण्यात आले असून, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.
अँग्रोव्हिजनच्या उद््घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर, अर्थ, वन व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, खा. अजय संचेती, जि.प अध्यक्षा निशा सावरकर आदी उपस्थित राहणार आहे.
अँग्रोव्हिजनची तयारी अंतिम टप्प्यात असून प्रदर्शनाचे डोम्स, कार्यशाळांचे भव्य स्टेज, सुमारे १0 हजार चौ. मि.चे प्रदर्शनाचे ७ हॅंगर्स तसेच मोठय़ा उपकरणांसाठी ३ हजार चौ.मी. आकाराचे आपेन स्टॉल व कार्यशाळांसाठी ४ मोठी दालने येथे उभारण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या या प्रदर्शनाला शेतकर्‍यांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून, यावर्षी ४00 हून अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. शेतकर्‍यांसाठी यावेळी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, बांबू विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच दुग्ध विषयावर सखोल ज्ञान मिळावे यासाठी लाईव्ह अँनिमल डेमोस्ट्रेशन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांना शेतीसंदर्भातील विविध विषयावर मार्गदर्शन व्हावे, यासाठी ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेचे उद््घाटन ११ नोव्हेंबरला सकाळी १0 वा. केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख उपस्थिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आदी उपस्थित राहणार आहे.
समारोप १३ नोव्हेंबरला
शहरातील रेशीमबाग मैदानावर १0 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अँग्रोव्हिजनचा समारोप १३ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसू नायक, छत्तीसगढ कृषिमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल, हरियाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनगड, मध्यप्रदेश कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन आदी उपस्थित राहणार आहे.