राष्ट्रीय समाज पक्ष भारतातील वैचारीक भ्रष्टाचार संपवणार : एस एल अक्कीसागर

0
91

विरार जि-पालघरमध्ये रासपचे मार्गदर्शन शिबीर

विरार(आबासो पुकळे),दि.22 : “भारता सारख्या देशात वैचारिक लोक आहेत. ते विचार करतात, बोलतातही. यामध्ये कोणी जातीपातीचे पाहू नये.  आर्थिक व राष्ट्रीय भ्रष्टाचारावर बोलतात परंतु देशात सर्वात मोठा वैचारिक भ्रष्टाचार आहे.  ज्यांना हा वैचारिक भ्रष्टाचार कळत नाही ते लोक शेवटपर्यंत बळी पडणार. राष्ट्रनायक महादेवजी जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष ‘ख्वाडा’ डावाने हा वैचारिक भ्रष्टाचार  संपवणार” असे  प्रतिपादन आरबीआयचे सेवानिवृत्त मॅनेजर तथा  राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय मुख्य महासचिव एस एल अक्कीसागर यांनी व्यक्त केले. विरार जि-पालघर येथे राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.  यावेळी संस्थापक/ पक्षाध्यक्ष महादेव जानकर, थोर विचारवंत, लेखक डाॅ. हरी नरके, इतिहास संशोधक संजय सोनवणी, प्रविण मोरे उपस्थित होते.

भारतात एकूण लोकसंख्येत ओबीसी 52 %, एस.सी 15 %, एस.टी 8 %, मायनाॅरिटी 13%, ब्राह्मण-बनिया 4%, इतर 8% असा राष्ट्रीय समाज  आहे.  आज राष्ट्रीय समाज सगळ्या पेचात अडकला आहेत. मराठा, पाटिदार आरक्षणासाठी लढतो आहे.  उत्तर भारतात ब्राह्मण समाज आरक्षणाची गोष्ट करत आहे याकडे लक्ष वेधत राष्ट्रीय समाज कसा पेचात आहे हे श्री. अक्कीसागर यांनी निदर्शनास आणले.

श्री अक्कीसागर पुढे म्हणाले,  ख्वाडा हा एक कुस्तीमधला डाव आहे. राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी असा ख्वाडा टाकला आहे की ते कोणी सोडवू शकत नाही. राजा,पंतप्रधान असे का निर्णय घेतो, आम्हाला कळत नाही. तुम्ही रासपचे सैनिक आहात. सैनिकांनी दिलेले कामचं करायचे. तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांचे विचारायचे नाही. पक्ष शिस्त पाहिजे. या देशात निष्टावान कार्यकर्ते फक्त महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहेत. त्याला ज्ञानाची गरज आहे.  रासप सैनिकांनी ज्ञानवान बनले पाहीजे यासाठी अशा केडरची गरज आहे. या केडरच्या माध्यमातून रासप सैनिकांनी ज्ञान घ्यावे आणि शिस्त पालनाचा संकल्प करावा.
यावेळी मार्गदर्शन शिबीरासाठी राज्यभरातून रासपचे पदाधिकारी/ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.