मुख्यमंत्र्यांची मेजवानी हुकवणा-या संध्या पवारांची बदली

0
19

मुंबई- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यानिमित्त राष्ट्रपती भवनाने आयोजित केलेल्या स्टेट डिनरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण असून सरकारी बाबूंच्या घोळामुळे जाता आले नव्हते. दरम्यान, निमंत्रण वेळेत मुख्यमंत्र्यांना न पोहचल्याने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील अधिकारी संध्या पवार यांची सरकारने तातडीने बदली केली आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनीही याला दुजोरा दिला आहे.
25 जानेवारी रोजी ओबामा भारत भेटीवर असताना राष्ट्रपती भवनाने स्टेट डिनरने आयोजन केले होते. त्यात देशातील नामांकित केवळ 250 जणांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, फडणवीस यांना ते निमंत्रणच मिळाले नाही. 21 ते 24 जानेवारीदरम्यान मुख्यमंत्री दाव्होसमधील जागतिक आर्थिक शिखर परिषदेला गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही निमत्रंणाची कल्पना नव्हती. मात्र, राष्ट्रपती भवनाने मुख्यमंत्र्यांना 17 जानेवारी रोजी निमंत्रण पाठवले होते. हे निमंत्रण नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पाठविण्यात आले होते. त्यानंतर हे निमंत्रण संध्या पवार यांच्याकडे पोहचले होते. मात्र संध्या पवार यांनी सरकारी पद्धतीने काम करीत मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या ओएसडीला माहिती न देता ते चक्क स्पीड पोस्टने पाठवून दिले.