निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांवर कारवाई नकाे; नागपूर खंडपीठाचे आदेश

0
7

नागपूर,दि.६़.:– निवडणुकीच्या कार्यासंबंधी शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची सक्तीची कारवाई करू नका. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, असा अंतरिम आदेश नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. तसेच या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीसही बजावली अाहे.

शिक्षकांवर अशैक्षणिक कार्याची सक्ती करू नये, अशी विनंती करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटनांची कृती समिती व अमरावती जिल्ह्यातील काही शिक्षकांनी याबाबत स्वतंत्र रिट याचिका दाखल केली आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याबाबत प्रतिबंध केला आहे. याचप्रमाणे शासन परिपत्रक ३ मे २०१३ नुसार शिक्षकांची प्रत्यक्ष निवडणुकीसाठी म्हणजे प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी याखेरीज इतर कामांसाठी सेवा घेता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.