पार्वती मतिमंद विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम

0
13
देसाईगंज दि.६़.:- सामान्य व्यक्तीचा तुलनेत दिव्यांग व्यक्ती ही समान आहे व त्यांना सुद्धा समाजात मुख्य दर्जा मिळावा अशी प्रेरणा ठेवून दिव्यांग व्यक्ती साठी शासन नेहमी तत्पर असून त्यांचा साठी नवनवीन उपक्रम उपलब्ध करून दिल्या जात आहे.अशाच एका दिवसाचे औचित्त्य साधून गडचिरोली येथे नुकतेच ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दीनानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रिड़ा व सांस्कृतिक स्पध॔चे आयोजन समाजकल्याण विभाग गडचिरोली यांच्या तफॅ करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील(अस्थिव्यंग,मतिमंद,मूकबधिर) दिव्यांगाच्या सव॔ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यात पाव॔ती निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक काय॔क्रम मधे जिल्ह्यातून मतिमंद प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकविला तसेच क्रिडा स्पर्धामधे चि.आशिष गावतुरे(स्पाॅट जम्प)चि.तूषार चवारे(25 मिटर चालणे.बहुविकलांग)चि.ज्ञानेश्वर दिवटे(बादलीत बाॅल टाकणे.बहुविकलांग)या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.सुरेश पेदांम सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.एन.डि.दहिकर सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदित्य देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांचे व कम॔चार्यांचे अभिनंदन केले.यावेळी शिक्षक श्री.जाहेद पठान,जयघोष राउत,सचिन कुकडे,कु.वैशाली येवतकर,कु.ललिता खोब्रागड़े विनोद कुड़मते,पवन रामटेके,चंदनप्रकाश पटले, कु.सुवणॉ खोब्रागडे,गुलाब दहिकर आदश॔ निनावे,मोहन नागापूरे व ईतर कम॔चारी गण व विद्यार्थी उपस्थित होते.