संत समेलनांच्या उदघाटनीय सोहळ्याला सुरवात

0
13

संत चोखोबा नगरी अर्जुनी मोरगाव,दि.१५ः- येथील जिल्हा परिषद हायस्कुल परिसरातील संत चोखोबा नगरी परिसरात आयोजित ७ व्या अखिल भारतीय संत समेलंनाच्या उदघााटनीय सोहळ्याला थाटात सुरवात झाली आहे.सुरवातील स्वातगाध्यक्ष इंजि.राजकुमार बडोले यांनी या समेलंनाचे समेंलनाध्यक्ष हभप लहवितकर महाराज व समेलनाचे उदघाटक केंंदिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,सहकार मंत्री सुभाष देशमुख,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, हभप नरqसग महाराज कापडे मराठवाडा अध्यक्ष,तुकाराम महाराज दुसाने,ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,मुुन्नालाल ठाकूर,हेमलता गिर्हेपुंजे,आरपीय राज्यध्यक्ष भुपेश थुलकर,जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे,नामदेव महाराजांचे वशंज नामदास महाराज,पंढरपूरचे मधुसूदन महाराज,शांताराम दुसाने नाशिक,मालुश्री विठ्ठलराव पाठील,सभापती अरविंद शिवणकर,नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, उमाकांत ढेंगे,कविता रंगारी,दिलीप चौधरी,माजी आमदार भैरसिह नागपूरे,लायकराम भेंडारकर आदी समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमापुर्वी गावामध्ये qदडी काढण्यात आली.
विशेष म्हणजे या दिंडीमध्ये पंढरपूरला जाणाèया वारकरांचा जी वेशभुषा असते,त्या पारंपारिक वेशभुषेत १०-१२ दिंडीतील वारकरी सहभागी झालेले आहेत.या दिंडीमध्ये शाळकरी मुलांच्या लेझीम पथकासह बँड पथकाचा समावेश होता. गुलाबी थंडी आणि सोनेरी किरणांची ऊब घेत हजारो जनसंख्येच्या समुूदायामध्ये सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी अभूतपूर्व उत्साहात निघाली. या ग्रंथदिंडीमध्ये अख्खे अर्जुनी/मोरगावकर सामील झाले. सर्व धर्म,समाजाच्या नागरिकांनी दिंडीला सुरूवात होतानाच अनेक वाद विवाद मागे सारून या ग्रंथदिंडीने मराठी सारस्वतांचा जयघोष केला. जवळपास एक हजाराहून अधिक जनसमुदायाच्या उत्स्फूर्त सहभागाने दोन तास चाललेली दिंडी दोन ते अडीच किलोमीटर लांबीची होती. या ग्रंथदिंडीने अवघे शहर दुमदुमून गेले. ‘ज्ञानोबा-माऊली-तुकारामङ्कचा जयघोष आसमंतात दुमदुमत असतानाच तुतारीने साहित्यिकांचे स्वागत केले. तर ढोल-ताशे-लेझीम, झांजपथक, बॅण्डपथक, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य आदी पथकांनी वातावरण भारून टाकले आणि अवघे शहर सारस्वतांच्या मेळ्यात डुंबून गेले. येथील दुर्गा चौकातून या दिंडीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शहरभ्रमण करीत दिंडी संमेलनास्थळी पोहचून ग्रंथ दिंडीचा समारोप करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य सोहळ्याला सुरवात करण्यात आली.

उश्रळलज्ञ हश