संतानी समाज तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचेच काम केले-ना.आठवले

0
58

अ.भा.मराठी संत साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

संत चोखोबा नगरी (खेमेंद्र कटरे),दि.15 – मराठा आणि बौध्दांटे जमत नाही ते जमले पााहिजे आणि या दोघांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. बहुजन थोर महापुरुषांच्या विचांराची दोन्ही समाजाला गरज आहे. सर्व संतानी समाज तोडण्याचे नाही तर, जोडण्याचे काम केले आहे. तेव्हा संताच्या पाऊलावर पाऊल ठेवित ते काम आपल्याला करावयाचे आहे. त्याकाळी गौतम बुध्द,संत कबीर,चार्वाकाची भूमिका समतेची होती. नेमकी तिच भुमिका घेत हे संत साहित्य समेलन समाजाला दिशा देणारे ठरणार आहे. हे समेलन महाराष्ट्राला नव्हे तर, भारताला वैचारीकदृष्टीने मजबूत करणारे आहे. आजघडीला समाज बदलत असला तरी समाज अद्याप पाहिजे तसा बदललेला नाही. त्यामुळे जातीने माणसाची ओळख होऊ शकत नाही,तर कर्माने माणसाची ओळख होते.असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अ.भा.मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणातून केले.
वारकरी साहित्य परिषद,समता प्रतिष्ठान नागपूर,बार्टी पुणेच्यावतीने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन अर्जुनी/मोरगाव येथे संत चोखोबानगरी परिसरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप रामकृष्ण लहवितकर हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख्, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे, समता प्रतिष्ठानचे प्रादेशिक व्यवस्थापक सिध्दार्थ गायकवाड, माजी आमदार हेमंत पटले, लोकमत आयबीएनचे संपादक राजेंद्र हुंजे, उपेंद्र कोठेकर, विरेंद्र अंजनकर, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सभापती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर,नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जि.प.सदस्य रचना गहाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पूढे बोलताना आठवले यांनी डॉ.आंबेडकरांनी त्यावेळी नदया जोड प्रकल्पाची भूमिका मांडली होती.ते काम आज नितीन गडकरी करीत आहेत. मी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम करतो. शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संतांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे देशासाठी अमूल्य देणगी असल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांंचा देश घडवायाचा आहे. बाबासाहेब हिंसंक भूमिका घेणारे नव्हत,तर सामज्यस्यांंशी भूमिका घेत सर्वांना सांभाळून समता कशी प्रस्थापित करता येईल या बाजूचे होते. अन्यायाच्या विरोधात राग आला पाहिजे. मन पेटवणे सोपे आहे, विझविणे मात्र अवघड आहे. तेच सुत्र हाती धरून विठ्ठल पाटील यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
आमच्या नावात राम तर बडोलेंच्या नावात राजकुमार आहे. दलित समाजात जन्मलेला हा राजकुमार आहे. भीमा कोरेगावसारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे बहुजन समाजला जोडण्याचे काम संत साहित्यतातून झाले पाहिजे. वैचारिक दिशा देणारे समेलन परिवर्तनाकडे घेऊन जाणारे संमेलन ठरले पाहिजे असे सांगून त्यांनी

ज्यांची ‘‘वाणी असते खरी ते असतात खरे वारकरी,
आज आम्ही आलेले आहोत राजकुमार बडोलेंच्या घरी
एकदा तरी धरा तुम्ही पंढरीची वारी
महाराष्ट्र आहे संताची भूमी देतो आम्ही समतेची हमी
अर्जुनी मोरगाववासियांना आली आहे नामी संधी
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही येणार आहोत तुमच्या कामी’’
ही विनोद कविता आपल्या रूबाबदार शैलीत सादर करून उपस्थितांना रिझवून ठेवित हास्यकल्लोळ निर्माण केला.स्वागताध्यक्ष म्हणून श्री.बडोले म्हणाले, अनेक संत पुरुषांनी महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला आहे. त्यांच्या शिकवणूकीमुळेच संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदतो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ आहे. आपली प्रबोधनाची परंपरा प्राचिन आहे. या परंपरेमुळेच ही भूमी पवित्र झाली आहे. आजही पालावर राहणारा भटक्या समाजातील माणूस हा वंचित आहे. तो विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. समाजातील विसंगती संतपुरुषांनी मांडली. संतपुरुषांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होण्याची गरज आहे. सातव्या शतकापासून ते आजपर्यंतची संतांची शिकवण ही माणसाला माणूस म्हणून वागविणारी आहे. संत साहित्यातून समाजाला दिशा देण्यासाठी हे संमेलन उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाध्यक्ष हभप रामकृष्ण महाराज लहवितकर म्हणाले, महाराष्ट्राची जडणघडण संतांच्या विचारातून झाली आहे. राष्ट्रधर्म हा महत्वाचा आहे. संतांमुळे देशात सुख समृध्दी आणि शांती निर्माण झाली आहे. बुवाबाजी व अंधश्रध्देला वारकरी संप्रदायामध्ये थारा नाही. सदाचाराचा मुळ स्त्रोत हा वारकरी आहे. वारकरी पंथामध्ये जातीधर्माचा विचार नाही. वारकरी संतांच्या विचाराची आज गरज आहे. तो विचार विविध पैलूतून दिसून आला पाहिजे. समृध्दीपेक्षा संस्कार हे महत्वाचे आहे. धर्मनीती व राजनीती एकत्र चालली तर अभ्यूदय निश्चित आहे. सामाजिक न्यायाचा विचार व वारकरी पंथाचा विचार एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. मध्ययुगीन काळात संत साहित्याची निर्मिती झाली. राष्ट्राला जे गरजेचे आहे ते विचार पसरविण्याचे काम आम्ही करीत आहोत. सदाचाराचे विचार म्हणजे वारकरी संपद्रायाचे विचार असा त्याचा उल्लेख होतो.शिवाजी महाराजांना तुकोबांनी जो संदेश दिला तो संंदेश आजही महत्वाचा आहे.राष्ट्रवादाकरीता या संतसमेलनाचा वापर व्हावे. राष्ट्रधर्मावर विचार व्हावा. शेतकरी,राजकारण,आदीवरही भाष्य व्हावे, आजघडीला भष्ट्राचार, व्यभिचार थैमान घालत आहे.राजनिती आणि धर्मनिती एकत्र चालली तर देशाचा नक्कीच विकास होऊ शकतो. या सिद्धांताप्रमाणे चर्चा होणे गरजेचे आहे. संत ही आध्यात्म क्षेत्रातील उच्च कोटीची अवस्था असून संत साहित्य लोकभाषेतून आणि लोकछंदातून अवतरीत झाले आहे. त्यामध्य लोकागीतांची सरणी आहे आणि लोकछंदाचे गुंपण आहे. त्यामुळे लोकसमूहाशी निगडित असलेल्या माध्यमातून त्यांनी आपले संत साहित्य वाहते करण्याची गरज निर्माण झाल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्यायराज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांनी मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक सामाजिक उत्थानासाठी आम्ही काम करीत आहोत. पशुसंवर्धनासाठी आम्ही तत्पर आहोत. गोरगरीबांसाठी काम केले पाहिजे. हजारोे वर्षापूर्वी संतानी समाजाच्या हितासाठी काम केले आहे. त्यांच्याच विचाराची धार आम्ही धरली आहे. त्या साधू संताच्या विचाराची परंपरा सामाजिक न्याय विभाग चालवित असून तेव्हा त्यांच्या विचाराची जाण हभप महाराजांनी जनतेला द्यावी. ग्रामीण भागात असे साहित्य समेलन आयोजित करुन शहरी संस्कृतीच नव्हे तर ग्रामीण संस्कृतीत संताच्या विचाराची अधिक जाण असल्याचे म्हणाले.

दरम्यान सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झाली. परंतु आजही शेतकरी सुखी नाही, मुबलक मोबदला,पतपुरवठा नाही, हमीभाव मिळाला नाही, योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे शेतकर्यांचा विकास रखडला आणि आत्महत्येकडे वळला. मात्र, आमच्या राज्य व वेंâद्रातील सरकारने शेतकNयांना वेंâद्रबिंदू माणून पन्नास टक्के नफा देण्याचे धोरण तयार केल्याचे सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शुद्ध रक्ताचे माणसे बनविणे व वाणीतून समाज घडविण्याचे काम वारकरी मंडळ करीत आहे. आठ हजार वर्षाचा इतिहास टिकवून ठेवण्याचे काम ़कुणी करीत असेल तर ते वारकरी संपद्राय करीत आहे. गावा गावात जाऊन हे काम सातत्याने वारकरी संप्रदाय करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

उदघाटनाच्या प्रारंभी या भारतात बंधूभाव नित्य वसू दे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते विणा आणि ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचेकडून हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी संमेलनाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली. यावेळी हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे, हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हभप बाबा महाराज राशनकर, हभप चैतन्य महाराज देहूकर यांचा मान्यवरांच्या हस्ते पंढरपूरचे प्रतिक घोंगडी, वारकरी फेटा व तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.दिलीप काकडे व बार्टीचे समता दूत सचिन फुलझेले यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार नरहरी बुवा महाराज यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.