मुंबईतील 42 हजार सफाई कामगारांना मालकी हक्काचे घरे देणार- सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

0
9

मुंबई, दि. 3:बृहन्मुंबईतील 42 हजार सफाई कामगारांना मालकी हक्काचे घरे देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे केली.

आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या सफाई कामगारांच्या विजय मोर्चात ते बोलत होते. श्री. कांबळे म्हणाले की, गोरगरीबांच्या हक्कासाठीकाम करणारे शासन असून कोणावरही अन्याय होणार नाही त्यासाठी शासन कटीबध्द आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना सर्व्हिस कॉटर देणाऱ्या ‘आश्रय योजने’च्या अंतर्गत महापालिका नोटीसा देत असते. त्या तात्काळ थांबविण्याचे आदेश संबंधीतांना आज पासून देण्यात आले असून सेवानिवृत्ती नंतर घर ही अट रद्द करुन पुर्नविकास होताच सेवेत असताना आहे त्या जागेवर मालकी हक्काचे घर दिले जाईल. तसेच 25 वर्षे अखंडीत सेवा ही अट शिथिल करण्यात येईल. वारसा हक्कानेनोकरी दिली जाईल, अशा घोषणा जाहीर करून श्री कांबळे म्हणाले की,ही प्रक्रिया पुर्णकरण्यासाठी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन येत्या 15 दिवसात आदेश काढण्यात येईल,असेहीश्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्रीसचिन अहिर, आमदार अमिन पटेल,विद्या चव्हाण,आमदार कालिदास कोळंबकर, दैनिक नवाकाळच्या संपादक जयश्री खाडिलकर, कार्यकारी संपादक रोहित पांडे, गोविंद परमवार आदी उपस्थित होते.
या संदर्भात दिनांक 2 मार्च 2015 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दैनिक नवाकाळच्या संपादक जयश्री खाडिलकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्वविकास 4 एफएसआय देऊन केला जाईल. पुनर्वविकास केलेल्या इमारतीतच कर्मचाऱ्यांना घरे दिले जातील. पुनर्विकासासाठी कमी पडल्यास महापालिकेच्या आरक्षणात अन्यत्र जागा घेऊन घरे दिली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते