जागतिक महिला दिनी माझी कन्येचा शुभारंभ

0
9

मुंबई – राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लिहलेल्या क्रांतिज्योती या प्रुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंजद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभागाच्या वतीने माहीम, मुंबई येथे माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकासमंत्री ना.पंकजा मुंडे राज्यमंत्री ना विद्या ठाकूर, सपना मुनगंटीवार सिने अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव श्री संजयकुमार, खा. राहुल शेवाळे, आ. सदा सरवणकर, आ. संगीता ठोबरे, महिला व बालविकास आयुक्त राजेंद्र चव्हाण, एकात्मिक बालविकास सेवायोजनेच्या आयुक्त विनिता सिंघल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा शुभारंभ करण्यात अभिनेत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या मानधन वाढीच्या निर्णयासाठी तसेच भाग्यश्री योजनेसाठी ना. मुनगंटीवार आणि ना. पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. अंगणवाडी सेविका व मदतदनिस राज्य सरकारच्या देवदूत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. यंदाच्या महिला दिनाचा मध्यवर्ती संकल्पना महिला सबलीकरण, मानवतेचे सबलीकरण असल्याचे सांगत महिला सबलीकरणासोबतच मानवतेचे सबलीकरण सुद्धा गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी क्रांतिज्योती प्रत्येत स्त्रीच्या मनात निर्माण केली. त्यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून मी जो लढा दिला त्यासह सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.क्रांतिज्योती प्रत्येकाच्या मनात आहे. ती अनुभवन्याची गरज ना. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना प्रतिपादित केली. अंगणावाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधन वाढीची घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. या सोहळ्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.