चार महिन्यात राज्यातील 31 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृहे

0
17

मुंबई दि 27=; राज्यात 4 महिन्यात 31 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृहाचे बांधकाम केले जाईल, अशी माहिती आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते . बैठकीस खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, नगर तसेच ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या सभागृहातील संवादातून मजबूत समाजाची निर्मिती होईल असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने देशासाठी काय केले पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कामातून घालून दिला आहे. त्यांचे आपल्या सर्वांवर मोठे ऋण आहे . महाराष्ट्रास सामाजिक विकासाचा वारसा देताना, प्रजेवर पुत्रवत प्रेम करताना जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. तलाव, पाणवठे, मंदीरे, धर्मशाळा, बांधून प्रजेला सुख आणि शांती बहाल केली. महाराष्ट्राच्या या कन्येच्या नावाने सभागृहे बांधून त्यांचा गौरव करावा या हेतूने 2018 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती असे आणून अर्थमंत्री म्हणाले की , यासाठो 40 कोटी रु चा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात ही सभागृहे बांधली जावीत आणि त्याचे काम वेगाने पूर्ण करावे अशा सूचना ही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.