२९ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर दक्षता जनजागृती सप्ताह

0
12

गोंदिया ,दि.26 :: लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २९ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने २९ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ, दुपारी १२ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे निबंध/घोषवाक्य स्पर्धा, दुपारी १२ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे जनजागृती संबंधी व्याख्यान, दुपारी ३ वाजता दांडेगाव, दवनीवाडा, परसवाडा येथील आठवडी बाजार/शासकीय कार्यालये, दुपारी ४ वाजता बसस्थानक गोंदिया येथे रिक्षा संघटनेतर्फे जनजागृती.
३० ऑक्टोबरला सुभाष गार्डन गोंदिया येथे सकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत पत्रके वाटप, सकाळी ८ ते ९ पर्यत हर्बल लाईफ हेल्थ क्लब, चांदणी चौक गोंदिया येथे महिला जनजागृती, दुपारी १२ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे जनजागृती संबंधी व्याख्यान, दुपारी २ वाजता जयस्तंभ चौक गोंदिया येथे टॅक्सी संघटनेतर्फे जनजागृती,
दुपारी ३ वाजता गोंदिया शहर, भानपूर, चुटीया, गंगाझरी, एकोडी येथे आठवडी बाजार/शासकीय कार्यालये.
३१ ऑक्टोंबरला सकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे पत्रके वाटप, सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे राष्ट्रीय एकता दिवस शपथ, सकाळी ११.३० ते दुपारी २ पर्यंत फुलचूर नाका, जयस्तंभ चौक, कुडवा नाका येथे पथनाट्य (असर फाउंडेशन भंडारा), दुपारी १२ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव येथे जनजागृती संबंधी व्याख्यान, दुपारी ३ वाजता मुंडीपार, मुरदाडा, खळबंदा, रावणवाडी येथे आठवडी बाजार/शासकीय कार्यालये.
१ नोव्हेंबरला सकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत जिल्हा क्रिडा संकुल गोंदिया येथे पत्रके वाटप, दुपारी १२ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे व्याख्यान, दुपारी १ वाजता औद्योगि प्रशिक्षण संस्था गोंदिया ते फुलचूर नाका व परत पायदळ जनजागृती रॅली, दुपारी ३ वाजता तांडा, खमारी, अदासी येथे आठवडी बाजार/शासकीय कार्यालये.
२ नोव्हेंबरला सकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत नविन रिंग रोड गोंदिया येथे पत्रके वाटप, सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम-जून्या पुलियावरुन पाल चौक-कुडवा नाका-बालाघाट रोड चौक-बसस्थानक गोंदिया-जून्या पुलियावरुन जयस्तंभ चौक-फुलचूर नाका-जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया पर्यंत मोटार सायकल रॅली (हेल्मेटसह), दुपारी ३ वाजता आमगाव, सालेकसा येथे आठवडी बाजार/शासकीय कार्यालये व ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथे दक्षता जनजागृती समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांनी कळविले आहे.