24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home महाराष्ट्र लिंक रोडवरील फूड डिलेवरी शाॅप आगीच्या विळख्यात

लिंक रोडवरील फूड डिलेवरी शाॅप आगीच्या विळख्यात

0
36
 शेखर भोसले /मुलुंड,दि.01: मुलुंड गोरेगांव लिंक रोड वरील डी मार्ट समोरील फ़ूड डिलेवरी शॉपला आज दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मुलुंड अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीची सूचना मिळताच ताबडतोब घटनास्थळी येवून आगीवर नियंत्रण मिळविले. मुलुंड पोलिस स्टेशनचे अधिकारी यासंबंधी अधिक तपास करीत आहेत.२४ तासाच्या आत मुलुंडमध्ये घडलेल्या आगीच्या या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक इमारतीचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट होणे गरजेचे आहे हा नियम असताना पालिकेने व अग्निशमन विभागाने अत्यंत जबाबदारीने व गंभीरतेने प्रत्येक इमारतीचे निरीक्षण करून फायर ऑडिट न करणाऱ्या इमारतींवर कडक कारवाई करणे खूपच जरूरीचे झाले आहे अन्यथा आगीच्या घटना रोज अश्याच वाढत जातील अशा भावना रहिवासी व्यक्त करीत आहेत.
blank