महावितरणचे गोंदिया अधिक्षक अभियंत्याची बदली

0
7

गोंदिया – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील 11 अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर व अमरावती विभागातील गोंदिया, यवतमाळ, वाशीम व अकोला या मंडळ कार्यालयांचा समावेश आहे.

महावितरणने अधिकाऱ्यांची बदलीप्रक्रिया सुरू केली. 26 मार्च रोजी महावितरणने बदली झालेल्या अधिकाऱ्यांसाठी आदेश काढला. या आदेशात राज्यातील 11 अधीक्षक अभियंत्यांचा समावेश आहे. अकराही अभियंत्यांची बदली समकक्ष पदावर झाली आहे.

यवतमाळचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांची बदली महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथील अंतर्गत सुधारणा कक्षात झाली आहे. वाशीमचे अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांची बदली नागपूर शहर विभागात झाली आहे. बारामती ग्रामीण मंडळातील नागनाथ इरवाडकर यांची बदली नाशिक विभागात पायाभूत आराखडा अधीक्षक अभियंता म्हणून झाली आहे. नागपूर विभागातील गोंदिया मंडळातील अशोक फुलकर यांची बदली यवतमाळ अधीक्षक अभियंता म्हणून झाली आहे. नाशिक विभागातील रंजना पगारे यांची बदली मुंबई येथील वीज दर नियामक कक्षात करण्यात आली. नांदेड येथील दत्तात्रेय हामाडे पायाभूत आराखडा, लातूर विभाग, औरंगाबादचे सुभाष ढाकरे पायाभूत आराखडा, पुणे विभाग, पेण येथील बाबासाहेब वाघांबरे सामग्री व्यवस्थापन विभाग, प्रकाशगड, कल्याणचे ज्ञानेश्‍वर गवनार पायाभूत आराखडा विभाग, प्रकाशगड, भांडूपचे सुदाम खंडारे पायाभूत आराखडा विभाग, औरगांबाद विभाग, प्रकाशगड येथील रामदास बुंदिले पायाभूत आराखडा विभाग यांची बदली नागपूर शहर विभागात झाली आहे. मार्च एन्डिंगनंतरच अधिकारी नवीन ठिकाणी रुजू होणार असल्याची माहिती आहे.