गडचिरोलीतील १०२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

0
30

गडचिरोली,दि.२३: नक्षलग्रस्त जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील १०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये ४ अपर पोलिस अधीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक, १६ पोलिस उपनिरीक्षक व ७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोलीचे तत्कालिन अपर पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व राजा रामासामी, तसेच सध्या कार्यरत महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी हे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर होणे, ही बाब गौरवास्पद असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.