‘जनगणना 2021’ ची तयारी सुरु ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

0
24

पहिल्यांदाच होणार ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन

मुंबईदि. 14 : भारताच्या जनगणना 2021’ च्या पूर्वतयारीअंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे. या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्याची चाचणी प्री-टेस्ट’ मध्ये होणार आहे.

भारताच्या महानिबंधक तथा जनगणना आयुक्तनवी दिल्ली यांच्या कार्यालयामार्फत देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना 2021 ची तयारी सुरु झाली आहे. येणाऱ्या जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने जनगणना आयुक्तनवी दिल्ली कार्यालयाने दि. 3 ते 11 जून 2019 या कालावधीत पुणे येथील यशदा मध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते दि. 3 जून रोजी झाले.

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनी महाराष्ट्रगुजराततेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा येथे प्रशिक्षण दिले. हे राज्यस्तरीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले.प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती झगडे यांनी प्री-टेस्ट’ ही जनगणनेची रंगीत तालीम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावलीसूचना पुस्तिकामाहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्कारणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होईलअसे प्रतिपादन केले.

प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्त विवेक जोशी उपस्थित होते. या प्रसंगी श्री. जोशी म्हणालेजनगणना 2021 साठी  प्री-टेस्ट’ अत्यंत महत्वाचा टप्पा असून जनगणना 2021 मध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून त्याची चाचणी प्री-टेस्ट’ मध्ये होणार आहे. जनगणना 2021 मध्ये माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी आणि संशाधकांना आवश्यक जनगणनेची माहिती प्राधान्याने उपलब्ध होऊ शकेल.