अधिवेशनाचे वाजले सूप,१३ जुलैपासून पावसाळी अधिवेशन

0
8

मुंबई-राज्य सरकारचे मार्च महिन्यापासून सुरु झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज शुक्रवारी सूप वाजले.पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलैपासून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली.दरम्यान हे अधिवेशन जनतेची फसवणुक करणारे ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.मराठा,मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकार गंभीर नाही.ओबीसी शिष्यवृत्तीच्या नावावर फसवणुक केली तर राज्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेची फसवणूक झालीय, अधिवेशन काळात सरकार गोंधळलेलं होते असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व विधानपरीषद विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी केला.
दरम्यान सरकारच्या वतीने ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई व केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारचे धोरण, या सत्रातील महत्वाचे विषय राहिल्याचे सरकारच्यावतीने सागंण्यात आले.