पर्यावरण संवर्धन संदर्भातील सृष्टी मित्र पुरस्काराकरिता प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0
10

मुंबई, दि. 19 : पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र (CEF)यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी पुरस्कार 2019-20 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. “सृष्टी मित्र पुरस्कार” हा राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सृष्टी मित्र पुरस्कारांची सुरुवात ही महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजेच 2011 मध्ये करण्यात आली. सृष्टी मित्र पुरस्कारांचे हे पाचवे संस्करण आहे. पर्यावरणपूरक तसेच पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रम व जाणीव जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे या उद्देशाप्रती शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सृष्टी मित्र पुरस्कार प्रदान केले जातात.

          शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, लेखक कवी, छायाचित्रकार, व्यंगचित्रकार, तज्ज्ञ, शिक्षक, महिला आणि इतर नागरिकांना पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रमातील आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि नवीन कल्पना मांडता याव्यात म्हणून  सृष्टी मित्र पुरस्कारांचे आयोजन आहे. स्थानिक पर्यावरणीय समस्यांना ओळखून राबविलेल्या प्रयत्नांचा तपशिल विद्यार्थी आणि नागरिक प्रवेशिका स्वरुपात सादर करु शकतात. पर्यावरणीय समस्यांना शाश्वत विकासाची जोड देऊन हाताळणे, पर्यावरण संवर्धनासाठी केलेले प्रयत्न उपयोगी आणि महत्वाचे आहेत.

          विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि प्रयत्न, शिक्षक किंवा तज्ज्ञांनी पर्यावरण शिक्षणातील वापरलेल्या अध्यापन पध्दती, लेखक आणि कवींचे पर्यावरण विषयक आणि पर्यावरण संवर्धनपर स्वनिर्मित साहित्य तसेच महिलांनी स्वत: किंवा समूहाने हाती घेतलेले पर्यावरणपूरक प्रयत्न हे सृष्टी मित्र पुरस्कारांच्या माध्यमातून प्रवेशिका स्वरुपात सादर करावे, असे आवाहन पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र यांनी केले आहे. सृष्टी  मित्र पुरस्कार 2019-20 साठी विद्यार्थी व नागरिकांकडून वेगवेगळया श्रेणींमधून मागविण्यात येत आहेत.

विविध श्रेणीत

          प्रत्येक श्रेणीतील सर्जनशील नाविन्य आणि उत्कृष्ट प्रवेशिकांना प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात येईल. पुरस्कार श्रेणी आणि त्यांचे स्वरुप हे पुढीलप्रमाणे आहे. यात पर्यावरण प्रकल्प –  श्रेणी प्रथम परितोषिक रु. 10,000 द्वितीय पारितोषिक रु. 8,000 तृतीय पारितोषिक रु. 5,000 पर्यावरण बालसाहित्य  – श्रेणी प्रथम परितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 पर्यावरण स्लाईड शो – श्रेणी  प्रथम पारितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 पर्यावरण छायाचित्र – श्रेणी प्रथम पारितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 पर्यावरण घोषवाक्य – श्रेणी प्रथम परितोषिक रु. 3,000 द्वितीय पारितोषिक रु. 2,000 तृतीय पारितोषिक रु. 1,000 इको क्लब – श्रेणी प्रथम परितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 पर्यावरण शिक्षणासाठी अध्यापन पध्दती – श्रेणी प्रथम परितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 पर्यावरण संवर्धनात महिलांचे योगदान – श्रेणी प्रथम परितोषिक रु. 5,000 द्वितीय पारितोषिक रु. 3,000 तृतीय पारितोषिक रु. 2,000 या वर्षी बालसाहित्य, स्लाईड-शो, छायाचित्र आणि घोषवाक्य या श्रेणीसाठी – पर्यावरण प्रदूषण जसे की, वायू, जल, माती, प्लास्टिक, समुद्री आणि ध्वनी हा विषय आहे.

या प्रवेशिका पाठविण्यासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर,2019 आहे. प्रवेशिका पाठविण्यासाठी पत्ता “सृष्टी मित्र पुरस्कार 2019-20, पर्यावरण शिक्षण केंद्र, 1 पाईनवूड अपार्टमेंट, 233/1/2, विधाते कॉलनी, औंध, पुणे 411067”आणि ई-मेल [email protected]  दूरध्वनी : 020-27298861.