30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया-गडचिरोलीत महसूल कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाला सुरूवात

गोंदिया-गडचिरोलीत महसूल कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाला सुरूवात

0
37

गोंदिया,दि.06ः- शासनासोबत झालेल्या बैठकामध्ये शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्या सहा वर्षाचा कालावधी लोटूनही अद्यापही कोणताही शासन निर्णय निर्गमित न झाल्याने महसुल कर्मचार्‍यांनी ११ जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनास सुरुवात केलेली आहे. ५ सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाभर बेमुदत संप पुकारण्यात आला.गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात लीलाधर पाथोडे सरचिटणीस तथा निमंत्रक जिल्हा समन्वय समिती,आशिष रामटेके, सहसचिव (राज्यस्तर) राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सरचिटणीस महसूल कर्मचारी संघटना,राजेश मेनन अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष पी.जी.शहारे,कार्याध्यक्ष राकेश डोंगरे,सुपचंद लिल्हारे,महेश कांचनवार,विठ्ठल राठोड,अतुल कडू,मुकुंद तिवारी,पवन बिसेन,संजय सांगोडे,मोहसीन खान,एन.के.पराते,चैताली मानकर,सोनाली भोयर,रुपचंद नाकाडे,संतोष नान्हे,कांता साखरे,आर.बी.भाजीपाले,सुरेंंद्र भजनकर,नरेंद्र तिवारी आदींचा समावेश होता.

तर गडचिरोलीतील आंदोलनात जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, गौरीशंकर ढेंगे, सरचिटणीस विजय करपते, अर्चना वडेट्टीवार, महिला प्रतिनिधी सोनाली कंकलवार, ललीत लाडे, दुष्यंत कोवे, शशी सिडाम, नितीन सवाईमुल, नितेश चिताडे, जितेंद्र कुळसिंगे, अहेरी येथे अमोल गव्हारे, एस. डी. बारसिंगे, अंगद दुधाटे, रोहित भादेकर, निमेश तोडसाम, चामोर्शी येथे सत्यनारायण अनमदवार, सुधा उके, ममता शेंडे, महेश चुनारकर, गडचिरोली येथे नितीन उंदिरवाडे, बाबुराव वनकर, प्रशांत भैसारे, मनिषा मडावी, आरमोरी येथे अर्चना दुधबावरे, दिलीप भैसारे, पराग खोब्रागडे, कल्पना नायडू, महानंदा मडावी धानोरा येथे देवा निकुरे, ज्ञानेश्‍वर ठाकरे, ईश्‍वर राऊत, धीरज जुमनाके, निमेश तोडसाम, निमेश गेडाम, गणेश गेडाम, महेश इंदूरकर, सुरेंद्र चव्हाण, पियुष आखाडे, चांदेकर, विकी कनाके, आशिष सोरते, शैलेश पाटील, प्रशात आदे, प्रशात लांडगे, लोणारे, राजेंद्र धुडसे, बावनवाडे, राजकुमार धनबाते, विलास तुपट, नारदेलवार, संतोष माने, काळबाजीवर, एटापल्ली येथे प्रकाश पुपलवार, लोमेश अलीवार, प्राजंली मेर्शाम, रोषन दरडे, सिरोंचा येथे सुभाष देहरकर, महेंद्र बारसिंगे, मोरेश्‍वर पटले, कोरची येथे ओम रेहपाडे, नागसेन वैद्य, लोकेश कुनाघाडकर, कुरखेडा येथे प्रमोद गावडे, मनोज मेहदंडे, बी. टी. भगत, देसाईगंज येथे सुनिल दिवसे, गोपाल वेलादी, लांजेवार, मुलचेरा येथे श्रीकांत कनेर्वार, श्याम दहिकार, आशिष पोरेड्डीवार, उत्पल खेवले, गोपाल ठवरे, रविंद्र बोदेले, दयाराम मेर्शाम, कोल्हाटकर, चहांदे, साधना, पदाधिकारी तालुकास्तरावर आंदोलनात सहभागी झाले होते.