गुन्हेगारी रोखणारी पहिली सोशल मीडिया लॅब चंद्रपुरात

0
11

चंद्रपूर,दि.3-चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाने उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मिडिया लॅबचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी होणार असून अशा प्रकारची लॅब राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात उभारण्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अतिशय सुसज्य व आधुनिक अशी ही देशातील एकमेव मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन आहे.
अतिशय सुसज्य व आधुनिक अशी ही देशातील एकमेव मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन आहे. दिल्ली, हैदराबाद व मुंबई येथे अशा व्हॅन्स आहेत. मात्र, चंद्रपूरची व्हॅन त्यापेक्षा जास्त आधुनिक आहे. मोठय़ा सभा, गर्दीचे ठिकाणी, दंगलीची घटना, अशी ठिकाणांचे दूरून चित्रीकरण करणे, सोबतच मोबाईलव्दारे व्हिडिओ पाठविण्याची सोय असल्यामुळे चंद्रपूर पोलिस हायटेक झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून भविष्यात प्रत्येक जिल्ह्य़ात ही लॅब उभारण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या सोशल मिडिया लॅब व मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनच्या उद्घाटन करताना ते बोलत होते. अत्याधुनिक अशा लॅबमध्ये २ सव्‍‌र्हर, ८ संगणक, ३ लॅपटॅब व २ टॅब, अशी यंत्रणा आहे. सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथे काम केले जाणार आहे. या ठिकाणी सोशल मिडिया पोस्ट, बातम्या, व्हिडिओंचे विश्लेषण करण्याची सोय आहे. फेसबुक, व्हाट्अ‍ॅप, युटय़ूब, व्टिटर, अशा एकूण १८ प्लॅटफार्म व १०० संकेतस्थळांचे नियंत्रण करण्याची व्यवस्था या लॅबमध्ये आहे. त्याचप्रमाणे लोकेशन, ३२ भाषा, २५ आंतरराष्ट्रीय भाषा आदींचे विश्लेषण करणारे साफटवेअर यात आहे. २४ तास ही लॅब काम करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यावेळी त्यांनी सादरीकरण करून सोशल मिडिया लॅब व मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन कशा प्रकारे कार्य करेल, हे सांगितले. ८ कॅमेरे, एक सव्‍‌र्हर, एक पिटीझेड कॅमेरा असलेल्या मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनव्दारे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्याचे काम केले जाणार आहे.