१७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
16

गोंदिया ,दि.२-राज्यात असंख्य पोलिस अधिकारी आपल्या बदलीच्या प्रतीक्षेत असताना नवीन सरकारने काही खास अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० एप्रिल रोजी जाहीर केल्या आहेत. त्यात नांदेड शहर उप विभागाचे उप अधीक्षक यांचा ही समावेश आहे. एकूण ४ अपर पोलिस अधीक्षक आणि १३ उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यात दोन जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

पोलिस महासंचालक कार्यालयाने ३० एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशात पोलिस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे चे अपर पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना पुणे शहरात गुन्हे विभागात उपायुक्त अशी नियुक्ती देण्यात आली आहे. श्रीरामपूर अहमदनगरच्या सुनिता साळुंके-ठाकरे यांना मुबई शहरात उपायुक्त पदी नेमण्यात आले आहे. नागपूर शहरातील उपायुक्त स्वाती भोर यांना महामार्ग सुरक्षा नागपूर येथे तैनात करण्यात आले आहे. पुणे शहरात गुन्हे विभागात उपायुक्त असलेले जे.जे.नाईकनवरे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात १३ पोलिस उप अधीक्षकाच्या बदल्या जारी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण नावासमोर आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात दिले आहे. विजय कबाडे, नांदेड शहर (अहमदपूर उप विभाग) विनायक ढाकणे,मालेगाव-नासिक (लोणावळा-पुणे) मोहन ठाकूर,सहायक उप आयुक्त अहमदनगर शहर (सहायक उप आयुक्त नासिक शहर) अनिल पाटील, सहायक उप आयुक्त सोलापूर शहर (सहायक उप आयुक्त पुणे शहर) राजन पाली,पुलगाव-वर्धा (प्राचार्य UTOC नागपूर) डॉ.अनिता जमादार उप अधीक्षक अहमदनगर ग्रामीण (SID औरंगाबाद) प्रवीण कुलकर्णी,SID औरंगाबाद (प्रतीक्षेत) सुरेश शिंदे, उप प्राचार्य PTS खंडाळा (ACP मुंबई शहर) सुर्यकांत,ACP मुंबई शहर (ACP ठाणे शहर) अनिल नंदलवार,सहायक समादेशक SRPF गोंदिया (सहायक समादेशक SRPF हिंगोली) प्रशांत वाघुंडे,उप अधीक्षक ठाणे ग्रामीण (ACP नासिक शहर) अतुल झेंडे, उप अधीक्षक माणगाव-रायगड (ACP नासिक शहर) सचिन गोरे,उप अधीक्षक भंडारा (ACP नासिक शहर) या सर्व १७ बदल्या दोन श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या आहेत. पारदर्शक प्रशासन असा दावा करणाऱ्या राज्यातील युती शासनाने पारदर्शकतेचा एक नवीन पायंडा या बदल्यानी पाडला असे लिहिले तर चूक ठरणार नाही