राज ठाकरे, नीतेश राणे सलमान खानच्या भेटीला

0
16

मुंबई दि. 7- बॉलिवूडमधील कलाकारांनंतर आता राजकीय नेतेही हिट अँड रन प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेला अभिनेता सलमान खानबद्दल सहानुभूती दाखवीत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेत त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली.

अभिनेत्री प्रीती झिंटा, बिपाशा बसू, मलाईका अरोरा-खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी सलमानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेत सहानुभूती दर्शवली.

याबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, ‘कायद्याचा मान राखण्यासाठी ज्याने प्रामाणिकपणे कर्तव्यपुर्ती केली, त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना भेटायला हे गेली नाहीत. त्यांना सामान्य जनतेशी काही घेणे-देणे नाही.‘
भाजपच्या काही नेत्यांनीही सलमानबद्दल सहानुभूती दर्शविली याकडे लक्ष वेधले असता, एका वृत्तवाहिनीशी बोलताना भंडारी म्हणाले, “भाजप पक्षाच्या वतीने कोणी अशी भूमिका घेतली नाही. ज्यांनी तशी मते व्यक्त केली असतील ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.”