राज्यातील गुन्हेगारी घटली – देवेंद्र फडणवीस

0
9

मुंबई दि.२०:आकडेवारीनुसार आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, आकडेवारीनुसार गुन्हेगारीचे आकलन करणे बरोबर नाही, असे सांगून त्यांनी किती गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होते, हे बघणे महत्त्वाचे ठरते. आमच्या सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने झाल्यानिमित्त मंत्रालय पत्रकार संघातर्फे फडणवीस यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील गुन्हेगारी वाढत असून, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी गुन्हेगारी कमी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी अवघी ८ टक्के इतकी होती. आम्ही जाणीवपूर्वक ही टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागच्याच महिन्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा का, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.