मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

0
8

मुंबई, दि ०३ – रुग्णांचे अतोनात हाल करणारा मार्ड डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व डॉक्टरांमध्ये शुक्रवारी झालेली चर्चा सफल झाली असून सुमारे ९० टक्के मागण्या शासनाने मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज रात्री ८ वाजल्यापासून डॉक्टर्स कामावर रुजू होतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या अनेक मागण्यांमधे प्रा. हुमणे यांची बदली करण्याचा निर्णय, बंधपत्रीत सेवेकरिता जास्तीतजास्त जागा उपलब्ध होण्याकरिता वरिष्ठ निवासी या संवर्गातील रिक्त जागांवर बंधपत्रीत उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय, बंधपत्रीत सेवा वाटप कालावधी ३ महिन्यांवरून २ महिने करण्याचा निर्णय, राज्यातील निवासी डॉक्टरांना पाच हजार रुपयांची पगारवाढ आदी महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.