प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी

0
9

आडवाणी यांची आणीबाणीची भविष्यवाणी आता प्रत्यक्षात
मुंबई- भाजप सरकारने आपल्या दडपशाही प्रवृत्तीची सोमवारी हद्द पार केली. सभागृहात आपला आवाज दाबला गेल्याल विधिमंडऴचे सदस्य विधानभवनाच्या दारात बसून आंदोलन करतात आणि आपले म्हणणे प्रसारमाध्यमांमाऱ्फत जनतेपर्यंत पोहोचवतात. मात्र, भाजप सरकारने परिपत्रक काढून प्रसारमाध्यमांना पायऱ्यावरील आमदारांच्या आंदोलनाचे चित्रीकरण करू नये, असे आदेश जारी केले. यावरून विधान भवनात चांगलेच वातावरण तापले.यामुळे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी संतप्त झाले. सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारच्या या दडपशाहीचा निषेध केला.
मंगळवारी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. दोन्ही दिवस विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याने त्यांनी सभात्याग करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर अधिवेशन सुरू केले. विऱोधकांची ही आक्रमकता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने एक परिपत्रक काढले. त्यात प्रसारमाध्यमांनी त्यांना दिलेल्या मंडपात कुणी आले तरच त्याचे चित्रीकरण करावे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अथवा परिसरातील चित्रीकरण करू नये, अशी सक्त ताकीद दिली. यावरून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चांगलेच भडकले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पायऱ्यांवरील आंदोलनाचे चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतल्याने सुरक्षापथकातील सुमारे 50 सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकारांना रोखले. त्यांनतर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, यांना भेटून घातलेल्या निर्बंधाची माहिती त्यांच्या कानावर घातली. विरोधकांना बोलू द्यायचे नाही आणि प्रसारमाध्यमांचा गळा घोटायचा, यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी आणीबाणी संबंधी केलेली भविष्यवाणी आता प्रत्यक्षात उतरू पाहत असल्याची कोपरखळी देखील यावेळी अजित पवार यांनी मारली.