भारताने 60 वर्षांत काहीही केले नाही- नारायणमूर्ती

0
16

बंगळुरु (वृत्तसंस्था) – गेल्या 60 वर्षांत जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असे एकही संशोधन भारताने केलेले नाही, असे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

बंगळुरू येथे झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या दीक्षांत समारंभात त्यांनी हे मत व्यक्त केले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या शिवाय देशातील एकाही पंतप्रधानांनी प्रभावी संशोधनाकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, आपल्या देशातील तरुणांमध्ये परदेशी विद्यापीठांमध्ये शिकणार्‍या तरुणांप्रमाणे बुद्धी आणि ऊर्जा समान असूनही कोणतेही प्रभावी संशोधन कार्य करू शकलेले नाही, असेही मूर्ती म्हणाले.

पुढे बोलताना मूर्ती म्हणाले, की भारतात 60च्या दशकात प्रगती झाली होती. त्यावेळी भारताने शिक्षण, आरोग्य, पोषण आणि निवारा अश्या विविध क्षेत्रात उत्तम प्रगती केली होती. शिवाय अणू ऊर्जा, अवकाश संशोधन कार्यक्रमही चांगले राबवले होते. आता आपण देशात पुन्हा संशोधनाचे काम, त्यासंबंधित पूरक वातावरण तयार करायला हवे. आपण आपला दृष्टिकोन व्यापक करायला हवा. आपल्या देशात परदेशी बुद्धिवादी आणि विद्यार्थी यांचे स्वागत करायला हवे. शिवाय परदेशातील सुप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये आपले विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षणासाठी परदेशात वेळ देऊ शकतील संधी निर्माण करणे आहे. भारत गेल्या 60 वर्षांमध्ये कल्पक असे काहीही करू शकला नाही, याची खंत वाटते.‘‘