23.9 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home महाराष्ट्र आम्ही काय झक मारायला आलो का – आमदार बंब

आम्ही काय झक मारायला आलो का – आमदार बंब

0
29

मुंबई – शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांवर भाजपचे आमदार प्रशांत बंब जाम भडकले. सभागृहात आम्ही इथे काय झक मारायला आलो आहोत का, असा प्रश्न बंब यांनी विचारला. अधिवेशनावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांचे भत्ते कापावेत, अशी सूचना त्यांनी अध्यक्षांकडे करतर कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली.
विरोधक सभागृहात आले तर चर्चा होईल ना,, त्यासाठी त्यांनी आधी इथे यायला हवं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर नक्की बोलतील असे बंब यांनी सांगितले.
अर्थात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असला तरी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आले, त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे.

blank